आमदार दीपक केसरकर यांची माहिती; कोणीही नाराज होऊ नये…
सावंतवाडी ता.२८-:आंबोली व गेळे गावाला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असून, याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, याबाबत घोषणा करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून, तेच याची घोषणा करतील. या गावांना भेडसावणाऱ्या कबुलायतदार प्रश्न अंतिम टप्प्यात असून, आवश्यक प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
