नगराध्यक्ष संजू परब यांचा उद्या शहर भाजपच्या वतीने सत्कार…

नगराध्यक्ष पदाची कमी कालावधीतील कारकीर्द यशस्वी केल्याबद्दल सत्कार; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अजय गोंदावळे यांचे आवाहन..

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी नगरपालिकेचा ७२० दिवस कारभार सांभाळताना लोकप्रिय ठरलेले भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांची कारकीर्द यशस्वी ठरली असून, उद्या दिनांक २२ डिसेंबर रोजी त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा शेवटचा दिवस असून, त्यांच्या यशस्वी कारकिर्दी बद्दल उद्या दुपारी १२ वाजता नगरपालिकेच्या हॉल मध्ये शहर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार होणार असून, या कार्यक्रमाला भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page