उपजिल्हा रुग्णालय परिसर रस्ता खड्डेमुक्त करा

सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांचे बांधकामाला निवेदन

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सिजर झालेल्या महिलांची नवीन इमारती मधून जुन्या इमारती मध्ये ने आण करत असताना, मध्ये असलेला रस्ता संपूर्ण खड्डेयुक्त व खराब झाला असून, त्यामुळे सिझर झालेल्या महिलांना असाह्य वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत तात्काळ दखल घेऊन येत्या आठ दिवसात तो रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, प्रा. सतिश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोंदे उपस्थित होते.

You cannot copy content of this page