एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी बंद पाळावा

रिक्षा चालक-मालक संघटनेचे आवाहन

*⚡कणकवली ता १९-:* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत विलीनीकरणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रिक्षा चालक मालक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यात कणकवली शहरातील रिक्षा चालक-मालक यांच्या सोबत खाजगी प्रवासी वाहन, सहा सीटर, मॅजिक यांनीही सहभागी होत पाठिंब्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी पगार आहे. त्यामुळे शासन सेवेत विलीनीकरणासाठीची कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. या मागणीला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने 21 रोजी हा बंद पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रिक्षा चालक मालकांसोबत खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, सहा सीटर, मॅजिक यांनीही यात सहभागी व्हावे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत हे दाखविण्यासाठी 21 रोजी हा बंद पाळावा, असे आवाहन रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने अण्णा कोदे, संतोष नाईक व बाळा वराडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page