नाम.जयंत पाटील यांच्याकडे सरपंचांनी केली मागणी
*⚡कणकवली ता.०२-:* नादगांवच्या विकासासाठी निधी देण्यात यावा तसेच ग्रामपंचायतीची 25 -15 ची विकास कामे त्वरित मंजूर करण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे नांदगाव सरपंच अफरोजा नावलेकर ,उपसरपंच नीरज मोरये,राष्ट्रवादीचे नेते रज्जाक बटवाले यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे व युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांचे स्वागत राष्ट्रवादीचे नेते रज्जाक बटवाले यानी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी नादगांव सरपंच अफरोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये उपस्थित होते. विकास निधी नसल्याने अनेक कामे रखडलेली आहेत त्यामुळे आपण सिंधुदुग जिल्हायासाठी भरघोस निधी उपलब्ध करावा असे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटीलयांना देण्यात आले. या वेळी युसुफ नावलेकर, आफताब बटवाले, बकर नावलेकर, तोहिद जेठी, अंजर बटवाले सरताज बटवाले, अफसर नावलेकर आदि उपस्थित होते.
