जयंत पाटील यांची टीका…
*⚡कुडाळ ता.३०-:* भाजपला लवकरच सत्तेत येण्याची घाई लागली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून एजन्सी मार्फत महाविकास आघाडीतील नेत्यांची बदनामी करत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने आमची कितीही बदनामी केली तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
