जिओ नेटवर्क खुदाईत आर्थिक व्यवहार ?

म्हणून सत्ताधारी भाजप गप्प;युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा आरोप

*⚡सावंतवाडी ता.२४-:* शहरात जियो नेटवर्क मार्फत सुरू असलेली खुदाई ही अपघातास आमंत्रण देणारी असून, सत्ताधारी गप्प का आहेत? यामागे मोठा आर्थिक व्यवहार तर नाही ना? असा सवाल युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीच्या सुंदर शहराची वाट लावली असून, येथील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांची काळजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना हे काम का केले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. आता शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थांच्या हिताचा बनाव करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकू नये असा सल्ला दिला आहे.

You cannot copy content of this page