*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? याप्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले, जिल्हा परिषद प्रशासन कुंभकर्ण निघाले म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिनांक १५ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे, आंदोलनाचा आजचा ४२ वा दिवस उजाडला. या आंदोलनाला मौजे सौंदाळे गावचे सुपुत्र, बामसेफचे राष्ट्रीय नेते, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त माजी कनिष्ठ अभियंता के एस कदम, मौजे तळवणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या माधवी महादेव तळवणेकर, महादेव तळवणेकर, गौरव महादेव तळवणेकर यांनी पाठिंबा दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरील बेमुदत घंटानाद आंदोलन ४२ व्या दिवशीही सुरू
