*⚡कणकवली ता.१५-:* कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथील फारुक शेख यांच्या कुटुंबियांना स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग यांचा मदतीचा हात दिला आहे फारुक शेख हे मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते. काही अल्पशा आजाराने त्यांचे काही महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले व त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरचा कर्ता गमावल्याने कुटुंबीयांना फार अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुले आहेत. त्यांची पत्नी घरकाम करून आपली मुले सांभाळत आहे. त्यांच्या गावातील एका व्यक्तीने स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग यांच्यासमोर व्यथा मांडली व तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना घरगुती गरजेच्या वस्तू व मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रसाद सुखटनकर, किरण मालपेकर, विनायक परब, तोसीम नावलेकर, राजू आलव,माळप्पा तळेकरी आदी उपस्थित होते. शेख कुटुंबीयांनी स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग यांचे आभार मानले.
हुंबरठ येथील फारुक शेख कुटुंबियांना स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग यांचा मदतीचा हात
