छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजन म्हणजे भाग्याचा दिवस

सावंतवाडी येथे भूमिपूजन वेळी भाजप नेते निलेश राणेंचे भावनिक उद्गार

*⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा आज माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, हा उद्घटन कार्यक्रम आपल्यासाठी भावनिक असून, आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रक्तात असल्याने तो आमचा रक्ताचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देवाच्या स्थानी मानत असून, त्यांच्यापेक्षा कोणीही आपल्याला मोठा नाही. त्यांच्यासारखे वेगळे व्यक्तिमत्व आपल्याला कोणी वाटत नाही. महाराज आपले जग असून, त्यांच्याच शिकवणीमुळे कोणालाही अंगावर घेण्याचा आपली तयारी असते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी त्यानी संजू परब यांच्या कामाचे कौतुक करत, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. असे उद्गार काढले आहेत.

You cannot copy content of this page