माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा
*💫सावंतवाडी दि.२१-:* मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर आपण उपोषणास आहोत, असा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात तळवणेकर म्हणाले की, मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याबाबत अनेक तक्रारी आहेत. अलीकडे मळगाव गावातील शाळेतील मुलांच्या ईबीसी फॉर्मवर सही करण्यासही त्यांनी टाळाटाळ केली होती. याबाबतचा त्यांच्या तक्रारीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. शाळकरी मुलांचे नुकसान करणाºया अशा मुजोर ग्रामपंचायत प्रशासकावर निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. या कारवाईसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा तळवणेकर यांनी दिला आहे. या मुजोर अधिकाºयाला वेळोवेळी पाठिशी घातले जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपोषणावेळी निर्माण झाल्यास त्यास पूर्ण जबाबदार आपण राहणार आहात, असेही तळवणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
