मानवाधिकार ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल कोल्हापूर दौऱ्यावर…

*💫कोल्हापूर दि.१९-:* मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किसन गोयल व राष्ट्रीय कमिटी हे सोमवार तारीख 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष भागीरथ गहलोत राष्ट्रीय मीडिया प्रभारी शरद शर्मा राष्ट्रीय महासचिव असलम मोहम्मद सिद्दीकी, राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष धर्मेश उपाध्याय व राष्ट्रीय महासचिव मोहम्मद यासीन शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तरी मानवाधिकार हनन, अन्याय अत्याचार संबंधी दाद मागण्यासाठी 11 ते 2 या वेळेत शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच ते यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून यावेळी नवीन पद्धत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रही देण्यात येणार आहेत तरी संबंधित कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यास आले आहे.

You cannot copy content of this page