रत्नागिरी येथे बढती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला सत्कार*
सावंतवाडी चे पूर्व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत. श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने सुशांत खांडेकर यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुशांत खांडेकर यांनी आपल्या कार्यकालामध्ये उत्तम काम केले. सर्वसामान्यांचे प्रश्न जलदरीत्या मार्गी लावले. शेतकरी, सर्वसामान्य, विद्यार्थी, इ. समाजातील सर्व स्तरांतील समस्यांचे निराकरण त्यांनी वेळोवेळी केले. कोरोनासारख्या महामारीमध्ये त्यांनी शांत पध्दतीने समस्या हाताळत दिवसरात्र मेहनत करत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. श्री. खांडेकर यांच्या कामाचा आलेख हा चढताच राहिला. या सर्वांमुळेच खांडेकर यांची रत्नागिरी येथे बढती झाली. आज श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री.लक्ष्मण देऊलकर, पदाधिकारी श्री.समीर शेख, बाबलो(दादा) राऊळ, राजन वरक, विलास म्हापसेकर, धोंडी कोळेकर, शरद पालव, रामचंद्र गावडे, नंदकिशोर खरात, दामोदर कदम, उल्हास साटेलकर, उमेश परचुरे, धाकु शेळके, आदी उपस्थित होते.
