पालकमंत्री सामंत यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता २७ केंद्रप्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करावा, वर्ग दोनची पदोन्नती देण्यात यावी, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत आदी प्रलंबित मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेने पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. दरम्यान याबाबत लवकरच ग्रामविकास विभाग व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेवून तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय भोगले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४४ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. ८९ पदे कार्यरत आहेत तर तब्बल ५५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका एका केंद्रप्रमुखांकडे तीन तीन ठिकाणचा चा पदभार आहे. त्यामुळे कामांचा अती ताण पडतो. शिवाय अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधून काही होत नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय भोगले, धोंडू रेडकर, सुहास सावंत, अनंत राणे आदी उपस्थित होते. दरम्यान या मागण्यांबाबत ग्रामविकास विभाग व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन दिले. असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय भोगले यांनी दिली. या आहेत प्रमुख मागण्या.. केंद्रप्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करावा, वर्ग दोनची पदोन्नती द्यावी, प्रवास भत्ता १६०० एवढा करावा, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, जॉब चार्ट निश्चित करावा, प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दोन केंद्रप्रमुखांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्काराने गौरविण्यात यावे, पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात,
