कोळोशी-आयनल-असलदे गावात तलाठी द्या

ग्रामस्थांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी

*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील कोळोशी आयनल असलदे गावात तलाठी नसल्याने गावातील बहुतेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावांना लवकरात लवकर तलाठी मिळावा अन्यथा कोतवालांला तलाठी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार यांची भेट देऊन दिले. कोळोशी सरपंच रितिका सावंत , उपसरपंच संजय पेडणेकर , सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण , सदस्य विश्वनाथ कदम , सानिका इंदप , वैशाली इंदप , सुशील इंदप आदींनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेतली. गेले अनेक दिवसांपासून आयनल , कोळोशी गावाना तलाठी नाही , परिणामी महसुलीची कामे खोळंबली आहेत. सध्या येथील कोतवाल हा कारभार सांभाळत प्राथमिक कामे करीत आहे. अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली. तर नवीन भरती होईपर्यंत आठवड्यातून एक दिवस तलाठी देण्याची ग्वाही प्रांताधिकार्‍यांनी ग्रामस्थांना दिली.

You cannot copy content of this page