पालकमंत्री उदय सामंत यांनी रिक्षा संघटनेच्या गणेशाचे घेतले दर्शन
*⚡कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी ‘राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे’, असे साकडे कणकवलीच्या राजासमोर नाम. उदय सामंत यांनी घातले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, ऍड. हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, निसार शेख, कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, भाई परब, अरुण परब, प्रभाकर कोरगावकर, संतोष सावंत, मनोज वारे, रमाकांत आरोलकर, संदीप घाडी, श्री. मोर्ये आदीसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.
