जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिली माहिती
*⚡सावंतवाडी ता.२६-:* आगामी जिल्हा बँक निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय राज्यस्तरावर झाला असून, जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान १५ दिवसांपूर्वीच मुंबई येथे वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्हिटर डॉनटस कणकवली नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
