Headlines

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विज कनेक्शन तोडु नका

भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी केली मागणी

*⚡बांदा दि.०२-:* महावितरण विद्युत मंडळाकडून सद्य स्थितीत थकित वीज बिलाची वसुली जोरात सुरू असून, विज बिल न भरल्यास विज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. परंतु, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतु, तरी देखील एकाही ग्राहकांचे विज कनेक्शन तोडल्यास या अन्यायकारक धोरणाबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जावेद खतिब यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page