केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात येणार

खारेपाटण प्रवेशद्वारावर भव्य स्वागत;कणकवलीत जोरदार तयारी

*⚡कणकवली ता.२८-:* केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची ‘ जन आशीर्वाद यात्रा ‘ सिंधुदुर्गात २७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होत आहे. २९ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे. शुक्रवार दि . २७ ऑगस्ट, २०२१ दुपारी ४ वा . खारेपाटण येथे आगमन व स्वागत, सायं . ४.४५ वा . तळेरे येथे स्वागत, सायं . ५.३० वा . वैभववाडी आत्मनिर्भर लाभार्थी भेट, सायं . ६.३० वा . फोंडा येथे स्वागत, सायं . ७.३० वा . कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत रात्री ८.४५ वा . होणार आहे.त्यानंतर कणकवली संपर्क कार्यालय येथे रात्री ९ वा स्वागत होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व सकल मराठा समाजातर्फे मंत्री नारायण राणे यांचे स्वागत, रात्री ९ .१५ वा. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग ऑफिस कणकवली येथे स्वागत. रात्री ओम गणेश बंगला व मुक्काम. शनिवार दि . २८ ऑगस्ट, २०२१ सकाळी १० वा. कणकवली येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण, सकाळी १०.३० वा . नांदगांव येथे स्वागत , सकाळी ११ वा. शिरगांव येथे स्वागत , दुपारी १२ वा. तळेबाजार येथे स्वागत, दुपारी १२.३० वा . जामसंडे – देवगड येथे उज्वला लाभार्थी, मच्छिमार, गुजराती बांधव व ओबीसी शिष्टमंडळ यांजकडून स्वागत, दुपारी १.३० वा. कुणकेश्वर येथे स्वागत, दुपारी १.४५ वा . कुणकेश्वर येथे जेवण , दुपारी ३.१५ वा . आचरा येथे स्वागत , सायं . ४.१५ वा . मालवण भरड नाका येथे स्वागत , सायं . ५ वा . चौके येथे स्वागत , सायं . ५.३० वा . कट्टा येथे स्वागत , सायं . ६.१५ वा . ओरोस तिठा येथे स्वागत , सायं . ७ वा . कुडाळ येथे स्वागत , सायं . ७.४५ वा . कोलगांव येथे स्वागत , रात्री ८.१५ वा . सावंतवाडी शहर येथे स्वागत.रात्री ओम गणेश बंगला , कणकवली येथे मुक्काम . रविवार दि. २ ९ ऑगस्ट, २०२१ सकाळी १० वा . वागदे येथील स्वर्गीय आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण, सकाळी १०.४० वा . कुडाळ एमआयडीसी येथे भेट , दुपारी १२ वा . बांदा येथे स्वागत , दुपारी १ वा . बांदा येथे जेवण , दुपारी २.३० वा . आडाळी एमआयडीसी येथे भेट , दुपारी ३.३० वा . दोडामार्ग गांधी चौक येथे स्वागत , सायं . ४.३० वा . सातार्डा येथे स्वागत , सायं . ५ वा . मळेवाड येथे स्वागत , सायं . ५.४५ वा . शिरोडा येथे स्वागत व सायं . ६.३० वा . वेंगुर्ला येथे स्वागत होईल.

You cannot copy content of this page