*⚡सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या जागी बाळा गावडे यांना जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष करण्यात आले होते. परंतु, आता त्यांना अधिकृतरित्या जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे.
जिल्हा कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
