प्रमोद जठारांवर वर गुन्हा दाखल करा:आम: वैभव नाईक यांची पोलिसांकडे मागणी
*⚡कणकवली ता.२६-:* रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने अटक केल्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत केली .प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मंत्री नारायण राणे यांच्याशी तुलना केल्याने माझ्या व समस्त संभाजी महाराज भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . त्यामुळे जठार यांनी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना आम.वैभव नाईक यांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे,कणकवली यांच्याकडे केली आहे. पोलिस निरीक्षक कणकवली यांना सादर केलेल्या निवेदनात आम. वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, संगमेश्वर येथे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून त्यांच्यावर अत्याचार केले . छत्रपती संभाजी राजे हे थोर युग पुरुष होते . त्यामुळे प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मंत्री नारायण राणे यांच्याशी तुलना केल्याने संभाजी महाराज भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . त्यामुळे जठार यांनी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा . मागणी शिवसेना आम.वैभव नाईक यांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे,कणकवली यांच्याकडे केली आहे.
