वैभववाडीत उद्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर

पत्रकार संघ व डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलचा उपक्रम

वैभववाडी/ प्रतिनिधी वैभववाडी तालुका पत्रकार संघ आणि वालावलकर रुग्णालय डेरवण तालुका चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 18 जुलै 2021रोजी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील पिवळे व केशरी कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे . कोरोनामुळे सर्व सामान्य नागरिकांची आथिर्कघ घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आजारपणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.तालुक्यातील आशा पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांसाठी मोफत केली जाणार आहे. शिबिरात होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढीलप्रमाणे: हर्निया,अपेंडिक्स,पित्ताशयातीलखडे,अल्सर,प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध,मुतखडा,चरबीच्या गाठी ,थायरॉईड,महीलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया,नाक कान घसा शस्त्रक्रिया,नाकाचे हाड वाढणे,कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आशा आजारातील शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण येथे मोफत होणार आहेत. यासाठी प्राथमिक तपासनी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे.याचा लाभ त्वरीत घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तरी इच्छुकांनी आपली नोंदणी किशोर जैतापकर 9404449990 ,नरेंद्र कोलते 9403558255 ,प्रा.एस.एन. पाटील 9834984411 ,उज्वल नारकर 9423300735 यांच्याकडे करावी असे आवाहन अध्यक्ष श्रीधर साळुंखे सचिव मोहन पडवळ यांनी केले आहे. शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी कोव्हीड तपासणी आवश्यक आहे.

You cannot copy content of this page