*💫मालवण दि.२४-:* चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने वसुंधरा दिन ते कृषिदिन या कालावधीमध्ये वृक्षलागवड अशा पर्यावरण पूरक अभिनव उपक्रमाअंतर्गत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावू या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ राजश्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आला. चिंदर गावामध्ये धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारी वड व पिंपळ वृक्षाची ५५ झाडे प्रति ग्रा.पं सभासद पाच याप्रमाणे लावून जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाचा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावू या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच दीपक सुर्वे ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, तलाठी योगेश माळी, पोलिसपाटील दिनेश पाताडे, ग्रां.पं. सदस्य केदार परुळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर, रणजित दत्तदास, भास्कर पवार, ग्रामस्थ दिलीप कुमार मेस्त्री, अरुण परुळेकर, विनोद केळुसकर उपस्थित होते.
वटपौर्णिमे दिवशी वडाचे झाड लावू उपक्रमाचा सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते शुभारंभ…
