‘मोदी हटाओ, देश बचाओ’ कणकवलीत काँगेसची घोषणाबाजी

खास.राहुल गांधी वाढदिवसानिमित्त कोरोनाना योदधांचा सत्कार

‘💫कणकवली दि.१९-:* देशाला वाचवायचे असेल, भारतीय लोकशाहीचा पाया पुन्हा एकदा भक्कम करायचा असेल, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी करायची असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करण्याचा दृढ संकल्प करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली कॉंग्रेस कमिटीने शहरातील मुख्य पटवर्धन चौकात एकत्र जमून ‘ राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ अशा जोरदार घोषणा देत जनजागृती केली. खास.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर संकल्प दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कारणाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. शाळा-कॉलेजे बंद असल्याने भावी पिढीचे ही शैक्षणिक दृष्ट्या खूप मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जीवनाशी खेळ केला असून फक्त आपली प्रतिमा संवर्धन करण्यावरच प्रामुख्याने लक्ष दिले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. कणकवली येथे राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित याप्रसंगी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिवाजी पाटील, शिक्षक अरविंद केळू गवळी, शिक्षक अमित अशोक शिंदे, नगरपंचायत आरोग्य कर्मचारी तेजस्वी पाटकर, रवींद्र महाडेश्वर, संतोष बाबाजी राणे, रमेश लक्ष्‍मण कदम, सचिन तांबे, प्रशांत राणे या सर्व कोविड योदधांचा तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या तत्पर सेवेसाठी आभार व्यक्त केले. संकल्प दिवसाच्या कार्यक्रमात कणकवली कॉंग्रेस कमिटीचे महेंद्र सावंत, निलेश तेली, महेश तेली, प्रवीण वरूणकर, प्रदीप तळगावकर, नादिरशहा पटेल, पंढरीनाथ पांगम, निलेश मालणकर, प्रदीपकुमार जाधव, अब्दुल्ला शफी काझी, संदीप कदम उपस्थित होते.

You cannot copy content of this page