कोरोना नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत निर्णय
*💫वेंगुर्ले दि.१६-:* आसोली गावात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी १८ ते २२ जून या ५ दिवसांच्या कालावधीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने धार्मिक स्थळे बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.याबाबतचा निर्णय आज झालेल्या कोरोना नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,गावात ५० हून अधिक जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर रुग्णांचा आकडा कमी न होता तो आणखीनच वाढत आहे.त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे..यात अत्यावश्यक सेवा वगळता गावातील दुकाने,हॉटेल,स्टॉल, सोसायटी, धान्य दुकान ,गिरणी तसेच धार्मिक स्थळे या पाच दिवसांच्या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे गावातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी या निर्णयाला सहकार्य करावे,असे आवाहन संबंधित समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
