*सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी शिरोडा नाका सर्वोदय नगर येथील रहिवासी सीताराम पडवळ (८५) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने ओरोस येथे निधन झाले त्यांनी एसआरपी- २ ग्रुपमष्ये २० वर्ष पुण्यात सेवा बजावली त्यानंतर महाराष्ट्र पोलीस बदली त्यानंतर प्रथम रत्नागिरी येथे काम केल. १९८३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हात बदली होऊन त्यांनी सावंतवाडीत पोलिसात २० वर्ष काम केल. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे.
सावंतवाडी-शिरोडा नाका येथील रहिवासी सीताराम पडवळ यांचे निधन
