*दुसऱ्या दिवशीही पावसाने मालवणला झोडपले

गटाराचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यांवर पाणी; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी*

मालवण दि प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले. यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. तर अनेक सखल भागात पाणी भरले होते. शहरात गटारे खोदाईचे काम अपूर्ण असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. नागरपालिकेकडून सध्या गटार खोदाईचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज सकाळपर्यंत मालवणात १३२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर आतापर्यंत मालवणात ५०३ मिमी एवढा पाऊस पडला आहे.

You cannot copy content of this page