वेंगुर्ले : प्रतिनिधी* रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषध वाटपाचा शुभारंभ सावळाराम कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला. उभादांडा गाव मोठ्या लोक संखेचा असून सद्या कोरोना बाधीत रुग्ण संख्या गावात वाढत असून काही रुग्ण हे दगावले आहेत. त्या अनुषंगाने सद्या गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढीकरिता हे औषधं अत्यंत उपयोगी असून या रोझारिओ चर्च युथ ग्रुप ने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या ग्रुप चे प्रमुख श्री. कार्मीस आल्मेडा, श्री. रोशन ब्रिटो, कार्मेलिन लुद्रिक, जोविता फर्नांडिस,श्री. बावतीस लुद्रिक, यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपसरपंच श्री. गणपत केळुसकर, डॉ.संजीव लिंगवत,ग्रामपंचायत सदस्य श्रीम. टीना आल्मेडा, श्रीम. श्रद्धा कुडाळकर, श्री. गणेश चेनवणकर,, श्री. सेलिस्टिन फर्नांडिस, श्री. नरसुले गुरुजी, श्री. यवजन आल्मेडा, पोलीस पाटील श्री. नार्वेकर, आशाताई निकिता घोंगे, श्री. योगीराज यादव आदी उपस्थितीत होते.श्री. कार्मीस आल्मेडा व डॉ. लिंगवत यांनी कोरोना मुक्त गाव संकल्पने साठी आपण पुढाकार घेऊया असे संबोधले व औषधा संबधी माहिती दिली. उपस्थितीत ग्रामस्थांनी रोझारिओ युथ ग्रुपचे आभार व्यक्त केले.
रोझारिओ यूथ ग्रुप उभादांडाच्यावतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप
