मंगळवारपर्यंत सकारात्मक तोडगा काढण्याचे नगराध्यक्ष- मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन; तोडगा न निघाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा, तूर्तास उपोषण घेतले मागे..
⚡सावंतवाडी ता.१०-: येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलनातील नगरपरिषद प्रशासनाने सील केलेले गाळे संबंधित मालकांना पुन्हा उघडून ताब्यात दिल्याच्या कारणास्तव सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी सावंतवाडी नगरपालिका कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू केले, जसे गाळे सील केल्यात तशी परिस्थिती पुन्हा आणून ठेवल्याशिवाय मागे हटणार नाही अशी कडक भूमिका त्यांनी घेतली अखेर नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी इतक्या मंगळवारी यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर श्री मुंज यांनी आपले उपोषण मागे घेतले परंतु मंगळवारी सकारात्मक तोडगा नाही निघाल्यास आपण या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी व्यापारी संकुलनामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे सात ते आठ बाय बेकायदेशीर रित्या पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्याचा आरोप करत श्री मुंज यांनी पालिका प्रशासनाकडे अशा गाड्यांवर कारवाई करण्याची याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून अशा गाळेधारकांवर कारवाई करत अलीकडेच तीन गाळयांना सील करण्यात आले होते. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता हे गाळे पुन्हा उघडण्यात आले. विशेष म्हणजे नगरपरिषद प्रशासनाकडून ज्या अधिकाऱ्यांकडून हे गाळे सील करण्यात आले त्याच अधिकाऱ्यांकडून हे गळे पुन्हा उघडणे गरजेचे असताना सदरचे गाळे संबंधित मालकांकडून उघडण्यात आले हे कायदेशीर रित्या चुकीचे आहे असे त्यांचे म्हणणे असून एकूणच या सर्व प्रकाराच्या विरोधात श्री मुंज यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता आज सकाळी नगरपालिकेमध्ये अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
विशेष म्हणजे नगरपरिषदेची मासिक बैठक सुरू होण्याआधीच त्यांनी लोकमान्य टिळक सभागृहाच्या दारासमोरच हे आंदोलन सुरू करत मुख्याधिकाऱ्यांना टार्गेट केले जोपर्यंत आपल्याला ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान बैठकीनंतर पुन्हा एकदा मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी श्री मुंज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी श्री मुंज यांनी नगराध्यक्ष यांच्यासोबत आपले म्हणणे मांडले, मुळात नगरपरिषद प्रशासन गाळा ताब्यात घेत असेल तर तो पुन्हा संबंधित व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाही. दुसरीकडे जेवढे मयत आहे त्यांच्या वारसांची ना हरकत नसल्यास उद्या त्यांचे वारसदार भांडायला उभे राहणार आहेत, याशिवाय कोर्टात दावा सुरू असताना असे गाळे पुन्हा हस्तांतरित करणे चुकीचे आहे त्यामुळे जसे गाडी सील केले होते तशी परिस्थिती पुन्हा आणून ठेवा आपण उपोषण मागे घेतो असे त्यांनी सांगितले यावर नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करत येत्या मंगळवार पर्यंत यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर श्री मुंज यांनी आपले उपोषण मागे घेतले मात्र प्रशासनाकडून मंगळवारी सकारात्मक तोडगा नाही निघाल्यास आपण मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करून दाद मागणार आहे असे त्यांनी सांगितले.
