रेडीतील दोन गरजू महिलांना शिवणयंत्र प्रदान

रोटरी क्लब ऑफ शिरोडाचा उपक्रम

*💫वेंगुर्ले दि.०१-:* रोटरी क्लब ऑफ शिरोडा तर्फे रेडी गावातील दोन गरजू महिलांना शिवण यंत्रे प्रदान करण्यात आली.रोटरी क्लब ऑफ शिरोडा द्वारे पंचक्रोशी मध्ये विविध लोकोपयोगी आणि लोकसेवेचे उपक्रम नेहमीच राबविले जातात. रेडी बोंमडोजीची वाडी ब्राह्मण मंदिर येथे बेलादिन डिसुझा व प्रणिता साळगावकर या दोन गरीब गरजू होतकरू महिलांना रोटरी क्लब शिरोडा तर्फे दोन नवीन शिलाई मशीन भेट देण्यात आली. महिला सबलीकरण होऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे हे रोटरीच्या अनेक लक्ष्यांपैकी एक लक्ष्य आहे. ते साध्य करण्याच्या दृष्टीने शिरोडा रोटरी क्लबचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष रो. अडव्होकेट योगेश महाले, रो. राजन शिरोडकर, रो. पुरुषोत्तम दळवी, रो. सचिन गावडे, रो. डॉ. सचिन गायकवाड, रो. दीपक मालवणकर, रो. भालचंद्र दीक्षित, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नामदेव राणे, माजी सरपंच कल्पना तेंडुलकर, सदस्य सायली पोखरणकर, वंदना कांबळी, विनोद नाईक, ब्राह्मण देवस्थान अध्यक्ष अशोक तेंडुलकर इत्यादी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळून हा उपक्रम पार पाडण्यात आला.

You cannot copy content of this page