निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीवरके. पी. गौरव बांदा संघाने विजेतेपदावर कोरले नाव…

विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण:क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.०७-: युवा निरवडे व बांदिवडेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” क्रिकेट स्पर्धेचा भव्य अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. युवा नेते मा. विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच निरवडेचे प्रगतशील शेतकरी अमय पै यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली आणि वातावरणात क्रिकेटचा जल्लोष रंगला.

अंतिम सामन्यात के. पी. गौरव संघ, बांदा आणि साईश इलेव्हन, कारिवडे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर के. पी. गौरव बांदा संघाने विजेतेपदावर नाव कोरले, तर साईश इलेव्हन कारिवडे उपविजेता ठरला. लतीक ब्लेसीयल नेमळे संघ तृतीय तर यशोधा वारियर्स, कलंबीस्त संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.

समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपसरपंच अर्जुन पेडणेकर, मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, निरवडेचे पोलिस पाटील अजित वैज, केतन अजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या के.पी. गौरव संघाचे संघमालक गौरव नाटेकर यांनी एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते स्वीकारले. उपविजेता साईश इलेव्हन कारिवडे संघाचे संघमालक हादेव नाईक यांनी द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व चषक स्वीकारला. तृतीय पारितोषिक विपूल नेमळेकर (लतीक ब्लेसीयल नेमळे), तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्रशांत मेस्त्री (यशोधा वारियर्स) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या यशस्वी आयोजनासाठी अमय पै, तसेच बांदिवडेकरवाडीचे प्रमुख कार्यकर्ते भरत बांदिवडेकर, योगेश्वर बांदिवडेकर, सखाराम बांदिवडेकर, भुषण बांदिवडेकर, कृष्णा बांदिवडेकर, मोहन बांदिवडेकर, राजन बांदिवडेकर यांच्यासह सर्व युवा कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देत तरुणाईला एकत्र आणणारी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ‘निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ ने स्थानिक क्रिकेटला नवा आयाम देत संस्मरणीय ठसा उमटवला.

You cannot copy content of this page