⚡वेंगुर्ला ता.०७-: वैयक्तिक कारणामुळे पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने शिंदेसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांच्याकडे देण्यात येणारा राजीनामा रविवारी झालेल्या सेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
राजीनाम देत असलो तरी यापुढेही शिवसेनेचाच कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार दिपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा आपण ऋणी राहील असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमुद केले आहे.
फोटो – नितीन मांजरेकर.
शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा…
