पाहणी करून विकासकामांचा घेतला आढावा:भरतगड किल्यासाठी आतापर्यंत 12 कोटी निधी खर्च..
⚡मालवण ता.०७-: मसूरे येथील भरतगड हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाचा आतापर्यंत बारा करोड रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी खर्च झालेला आहे. येथील तटबंदी मजबूत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यापुढील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण या किल्ल्याची आज पाहणी केलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रक लवकरच बनविण्यात येईल. ही कामे सुद्धा वेळेत पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. या किल्ल्याला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी येथील रस्ता हा जिल्हा नियोजन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पक्का स्वरूपाचा होण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच या किल्ल्या बाबतची माहिती असलेला फलक या ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ना आशिष शेलार यांनी येथे दिली.
मसुरे येथील भरतगड किल्ल्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी किल्याचा मुख्य बुरुज, आतील टेहळणी बुरुज, खंदक, प्राचीन विहीर याबाबत माहिती घेतली. तसेच किल्यातील सिद्ध महापुरुष मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी ना शेलार यांनी पुरातत्व विभाग डायरेक्टर तेजस गर्गे यांना या किल्याबाबत माहिती दर्शवणारा फलक कायम स्वरूपी लावावा अशा सूचना केल्या.
यावेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव अतुल काळसेकर, पुरातत्व विभाग डायरेक्टर तेजस गर्गे, सहाय्यक संचालक विलास वहाणे, मंत्री महोदयांचे ओएसडी शरद डोके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, संदीप हडकर, संग्राम प्रभूगावकर, बंडू गावडे, रोहेश गावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, यासिन सय्यद, पराग खोत आदी उपस्थित होते.
