मालवणचे माजी नगरसेवक तथा क्षुधा शांती हॉटेलचे मालक गुरुनाथ बाणावलीकर यांचे निधन

*💫मालवण दि.३१-:* मालवणचे माजी नगरसेवक आणि मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध क्षुधा शांती निवास या हाॅटेलचे मालक गुरुनाथ उर्फ पप्पा जयवंत बाणावलीकर (८२) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी निधन झाले. मालवण नगरपरिषदेत बरीच वर्षे नगरसेवक पद भूषविणारे श्री बाणावलीकर यांनी काही काळ उपनगराध्यक्ष पदही भूषविले होते मालवणच्या भंडारी हायस्कुलचे ते माजी विद्यार्थी होत कबड्डीपटू म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ मधील प्रसिध्द डॉक्टर निलेश बाणावलीकर यांचे ते वडिल होत. सा.आघाडीचे संपादक नंदकिशोर महाजन यांचे ते सासरे होत.

You cannot copy content of this page