संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांचा पुढाकार
*💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.शशिकांत खोत हे आज निवृत्त होत असून त्यांनी गेल्या दीड वर्षात कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेत श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे सन्मानपत्र देत श्री.शशिकांत खोत यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिवस रात्र काम करणारे, सर्वांशी प्रेमाने वागणारे,सर्वाना सोबत घेत काम करणारे, नाजूक प्रसंग सचोटीने हाताळणारे अशी शशिकांत खोत यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज असा हा अवलिया पोलीस सेवेतून निवृत्त होत आहे. श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री.मंगेश तळवणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार आज करण्यात आला. दरम्यान तळवणेकर म्हणाले, कोरोना काळात प्रांताधिकारी श्री सुशांत खांडेकर, तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे व पोलीस निरीक्षक श्री शशिकांत खोत यांनी ब्रह्मा-विष्णू-महेशाप्रमाणे काम केले आहे. या सर्वांचे कार्य जनतेच्या नक्कीच लक्षात राहील, असे सांगितले. संघटनेच्या वतीने खोत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्री.राजन राऊळ, दीपक राऊळ, निलेश कोलेकर, राजन वरक, रितेश पार्सेकर, धुळू कोकरे, बाबू कोकरे, ठकू कोलेकर आदी उपस्थित होते.
