बाजारपेठेचे विकेंद्रीकरण केल्यास गर्दीवर नियंत्रण येवू शकते

नगरसेवक परिमल नाईक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

*💫सावंतवाडी दि.३०-:* शासनाच्या नियमानुसार सध्या सावंतवाडी शहरातील बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहे पण बाजारपेठ केंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही पर्यायाने कोवीड १९विषयक शासकीय नियम व अंमलबजावणीचा सुद्धा फज्जा उडताना प्रकर्षाने दिसत आहे परिणामी आपल्या आरोग्य व इतर यंत्रणेवर सुद्धा अवाजवी ताण येत आहे. बाजार पेठेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाड्या – वाड्यावर, वॉर्ड निहाय परवाना धारक भाजी, फळे, मासे विक्रेते यांना स्वच्छतेविषयी अटी व शर्ती घालून परवानगी दिल्यास व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्या मध्ये सामावून घेतल्यास तसेच किराणा व्यापाऱ्यांना विनंती करून होम डिलिव्हरी वर भर दिल्यास बरेच प्रमाणात बाजारपेठचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण व काबू ठेवता येईल परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांवर सुद्धा अन्याय होणार नाही व पर्यायाने कोविड १९ विषाणूचा फैलाव रोखून खऱ्या अर्थाने महामारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल . दिवसेंदिवस कोविड १९ च्या रुग्णांमध्ये दुर्दैवाने वाढ होत आहेत ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून संरक्षात्मक व तद्विषयी उपाययोजना पूरक योग्य व रास्त आदेश पारित करावे ही नम्र विनंती नगरसेवक अॅड .परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे मागणी केली आहे.

You cannot copy content of this page