⚡बांदा ता.०५-:
दि.५/०६/२०२६)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराशेजारी तसेच शेतात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शाळेच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी फळझाडे व उपयुक्त वृक्षांची लागवड केली. प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत नियमित पाणी देणे व संरक्षण करण्याचा संकल्प केला.
वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास, शुद्ध हवा मिळण्यास व जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून पालक व ग्रामस्थांनाही वृक्षारोपणासाठी प्रेरणा मिळाली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी राबविलेली ही वृक्षारोपण मोहीम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील , सहकारी शिक्षक आशिष तांदुळे,, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
जागतिक पर्यावरण दिनी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची वृक्षारोपण मोहीम …
