ग्रामपंचायत करत असलेल्या “त्या” अनधिकृत रस्त्याविरोधात विजय सावंत यांचे उपोषण

*💫सावंतवाडी दि.०२-:* कोलगाव चर्च येथून साटेलकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाणंदमध्ये अनधिकृतपणे कोलगाव ग्रामपंचायत शासकीय निधीतून रस्ता करत असल्याचा आरोप ठेवत कोलगाव येथील विजय सावंत यांनी येथील पंचायत समितीसमोर कुटुंबीयांसमवेत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोलगाव जुन्या राष्ट्रीय महामार्गाला लागून कोलगाव चर्च ते साटेलकर घरापर्यंत जाणार्या पाणंदीवर आपला मालकी हक्क असून सदर जमिनीची शासकीय मोजणी केलेली आहे असे असतानाही वारंवार ग्रामपंचायत प्रशासन तसेच गटविकास अधिकारी सावंतवाडी यांचे लक्ष वेधूनही सदर जमिनीवर ग्रामपंचायत कोलगाव कडून शासकीय निधी खर्च करून रस्ता केला जात आहे. सदरचे काम हे अनधिकृत असल्याने तसेच न्यायालयीन बाबीसाठी ग्रामविकास अधिकारी कोलगाव ग्रामपंचायत कडे कागदपत्रांची मागणी देखील केलेली आहे असे असतानाही ही अद्यापपर्यंत कोणतीही कागदपत्रे ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्याला दिली नसून शेवटचा पर्याय म्हणून आपण बेमुदत उपोषण हाती घेतले आहे असे यावेळी विठ्ठल सावंत यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामपंचायतीकडून आपल्या जागेवर अतिक्रमण केले असून याचा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत आहे मुळात शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी 23 नंबर ला नोंद करायची असल्यास त्याचे दानपत्र किंवा बक्षीस पत्र शासकीय मोजणी करून ग्रामपंचायतीला द्यावे लागते मात्र तशी कुठलीही बाप ग्रामपंचायतीने पूर्ण केलेली नाही अथवा आम्हाला नोटिशीव्दारे कळविले सुद्धा नाही. काही राजकीय व्यक्तींच्या दबावापोटी सदरचे काम ग्राम विकास अधिकारी व शासनाकडून नियुक्‍त करण्यात आलेल्या प्रशासक यांनी सुरू केलेले आहे. आपण सदरचे काम करताना ग्रामपंचायतीने सदरची पाणंद स्वखर्चाने शासकीय मोजणी करावी जर सदर पानंद माझ्या कब्जातील हक्काच्या क्षेत्रात नसल्याचे स्पष्ट झाल्यास सदरचे रस्ता काम करण्यास माझा कोणताही अडथळा असणार नाही असेही आपण गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते, तोपर्यंत सदरचे काम स्थगित करण्याची विनंती आपण केली होती मात्र आपल्या मागणीला कोणत्याही प्रकारची दाद न दिल्याने आज आपण उपोषणाचा मार्ग हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत शामसुंदर सावंत विक्रम सावंत, विशाखा सावंत,वर्षा सावंत, रेशमा सावंत आदी कुंटूबियही उपोषणास बसले आहे.

You cannot copy content of this page