कुडाळच्या देसाई वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन…

राजा राममोहन रॉय जयंतीचे औचित्य..

कुडाळ : येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने आज राजा राममोहन रॉय यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वाचनालयाच्या सभागृहामध्ये राजा राममोहन रॉय फौडेशन कलकत्ता कडून देणगीदाखल मिळालेल्या हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या हस्ते राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी या संस्थेचे कार्यवाह विवेक पाटणकर सदस्य मंगेश मसके, इतर कर्मचारीवर्ग, वाचक गिरीश शिरसाट व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page