कट्टा येथे आयोजन:नामवंत बँकांचा समावेश..
⚡कुडाळ ता.२०-: अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने ३० मे २०२६ रोजी कट्टा येथे सकाळी ११ वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँक क्षेत्रातील रोजगार बाबत हा मेळावा असून भंडारी समाजातील इच्छूकानी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा बुधवार दिनांक २० मे रोजी कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड – कुडाळ येथे जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कार्यकारीणीचे पदाधीकारी सर्व कार्यकारीणी सदस्य, पदसिद्ध सदस्य उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रातील हा रोजगार मेळावा हा मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल, पेट्रोल पंप नजीक, कट्टा या ठिकाणी दिनांक ३० मे २०२६ रोजी घेण्याचे सर्वाच्या मताने ठरविण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रातील भंडारी युवक युवती यांच्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी युवक आणि युवतीनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडुन आलेले रुपेश अशोक पावसकर यांचा जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन भंडारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी, माजी अध्यक्ष जिल्हा सदस्य रमण वायंगणकर, जिल्हा सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा सदस्य सह सचिव प्रियदर्शन कुडव, जिल्हा सदस्य विकास वैद्य, निलेश गोवेकर, लक्ष्मीकांत मुंडये, भरत आवळे, श्रीकांत वेंगुर्लेकर, विकास वैद्य, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, गजानन वेंगुर्लेकर आणि अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त भंडारी समाजातील तरुण – तरुणींसाठी मर्यादित असा हा बँकिंग क्षेत्रातील मेळावा आहे. यात असिस्टंट मॅनेजर पदांसाठीची भरती होणार असून. यात अक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयायसीआय बँक या बँक सहभागी होणार आहेत.
यासाठी पात्रता आणि अटी : शिक्षण – कोणत्याही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, अनुभव – फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही पात्र… वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे, कागदपत्रे : अद्ययावत बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे.
ज्या मुला – मुलींनी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर विशेष सत्राचे आयोजनही यावेळी केले जाणार आहे.
उमेदवारांची लेखी परीक्षा न होता थेट मुलाखत होणार आहे. एकाच दिवसात निवड व त्वरित निकाल मिळेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तात्काळ ऑफर लेटर दिले जाणार आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुमचा गुगल फॉर्म भरायाचा आहे.
https://forms.gle/rcamFkj8aMdy3GjQ8
किंवा अधिक माहितीसाठी हेमंत करंगुटकर (9423513647), रमण वायंगणकर (9623727920), समील जळवी (9421235508), राजू गवंडे- (9067474899),
प्रियदर्शन कुडव (94233 52626) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
