⚡बांदा ता.०२-: विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने संस्थेचा २० वा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक ३ मे रोजी गुढीपूर पिंगुळी येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “कला आंगण महोत्सव २०२६” मध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता ठाकर समाजाच्या वधू-वर सूचक पालक मेळाव्याने होणार असून सायंकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर (कै.) शरद गरूड स्मृती कला पुरस्कार २०२६ तसेच “कोकणरत्न सन्मान २०२६” पुरस्कारांचे वितरण व अन्य सत्कार सोहळा पार पडणार आहे.
रात्री ८.३० वाजता ठाकर लोककलेचे सादरीकरण होणार असून रात्री १० वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा “सुवर्णमणी प्राप्ती” हा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक परशुराम गंगावणे यांनी केले आहे.
बांद्यात ‘कला आंगण महोत्सव २०२६’ उद्या…
