मळेवाड जकात नाका येथे आज रंगणार “नेरूर चा शिमगोत्सव “…

रक्तदान शिबिर व महिलांसाठी हळदी कुंकू चे ही आयोजन..

⚡सावंतवाडी ता.०२-: युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १ मे ते मंगळवार ५ मे पर्यंत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे.
या महोत्सवात काल १ मे रोजी निमंत्रित बाल गायकांची भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभला.

आज २ मे रोजी, मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर,दुपारी २:३० वाजता महिलांसाठी “हळदी कुंकू “कार्यक्रम तसेच रात्रौ ८:३० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप ,नेरूर यांचा ” “नेरूर चा शिमगोत्सव ” कार्यक्रम.खास आकर्षण हालते मनमोहक चित्र रथ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे

You cannot copy content of this page