सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून वजराट गावात विविध विकासकामे मंजूर…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील
वजराट गावात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची भूमिपूजने सोमवारी 27 एप्रिल रोजी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते संपन्न झाली. ग्रामपंचायत वजराट मधील इलेक्ट्रिक वीस पोलचे कन्वर्जन करणे साठी 5 लाख रुपये निधी, वजराट परबवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणेसाठी 17 लाख रुपये निधी, वजराट चव्हाटा मंदिर ते पलतड परबवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे, पिंपळगाव उदवगिरीवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे, तसेच वेंगुर्ला पंचायत समिती सेस फंडातून पिंपळगाव शाळा दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये निधी मंजूर इत्यादी विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांचा शुभारंभ मनीष दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, गावप्रमुख सूर्यकांत परब, वजराट श्री देव गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव उर्फ ताता परब, वजराट सोसायटी व्हाईस चेअरमन दत्तात्रय वजराटकर, वामन भोसले नितीन परब, माजी सरपंच रमेश राणे, माजी सरपंच महेश राणे, शाम परब, राजन परब, सोसायटी संचालक सत्यवान सावंत, निवृत्ती घोणे, मंगेश परब,संदीप पेडणेकर, तसेच वजराट, पिंपळगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page