⚡सावंतवाडी ता.०४-: दांडेली येथील दांडेलीवाडी मुख्य रस्ता ते मनोहर परब यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये मंजूर झाले असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये श्री. केसरकर यांच्या विकास निधीतून मंजूर झाले. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी योगेश नाईक, बाळा मोरजकर, संजू पंगम, बाबी परब, पप्पू धुरी, प्रथमेश कर्पे, ओंकार परब, सुभाष मोरजकर, संतोष धुरी, तात्या मोरजकर, भगवान मोरजकर, दादा गावडे, श्री. आंबेकर व दांडेली ग्रामस्थ उपस्थित होते
