अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये यांची निवड..
⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली. यावेळी कुडाळ तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांच्याशी संलग्न असलेल्या या कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. शिल्पा हरेश घुर्ये यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. स्नेहल हेमंत कुडाळकर, कार्यवाह म्हणून सौ. सुप्रिया शिवप्रसाद राणे, खजिनदार पदी सौ. अपर्णा अवधूत शिरसाट, सहकार्यवाह म्हणून सौ. उन्नती उमेश राणे, कार्यकारणी सदस्य म्हणून सौ प्रिया विद्याप्रसाद बांदेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, सहकार्यवाह राजन नाईक, कार्यकारिणी सदस्य संजय भोगटे, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संदेश पडते, उपाध्यक्ष बाळा कोरगावकर, कार्यवाह महेश ओटवणेकर, खजिनदार अक्षय सावंत, द्वारकानाथ घुर्ये, गोविंद सावंत, भूषण मटकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या काही दिवसातच उर्वरित कार्यकारणी जाहीर केली जाईल, व महिला सबलीकरण व व्यापार उद्योगाबाबत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल असे कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेने ठरविले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तर्फे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
