“भक्तनिवास” चे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत
औपचारिक उदघाटन..
⚡वेंगुर्ला ता.०३-: श्री मठ संस्थान दाभोली
श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज श्री मठात २६४ वा श्री गुरु महापुण्यतिथी वार्षिकोत्सव रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यकम संपन्न होणार असून येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवास चे औपचारिक उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती सचिन वालावलकर यांनी दिली. यावेळी प्रशांत प्रभूखानोलकर उपस्थित होते.
शनिवार ४ एप्रिल रोजी
सकाळी ६ वा. मंगलधून,
सकाळी ७ ते १० वा.श्री देव नारायण पूजा,श्रीमत् पूर्णानंद स्वामी समाधी व सर्व समाधी पूजा, सकाळी ७.३० ते १२.३० वा. मंगलाचरण, देवता प्रार्थना, गणपती पूजन, स्वस्ती पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण, प्राकार शुध्दी, प्रधान देवता आवाहन व पूजन, पवमान सूप्त जप,
दुपारी १२.३० वा. आरती,
दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. धुपारती,
सायंकाळी ७.३० ते ९.३० वा.ह.भ.प. संदिप बुवा मांडके, पुणे यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार आहे.
रविवार ५ एप्रिल पहाटे ५ ते ५.५० वा. मंगलधून, सकाळी
6 ते 10 वा. श्री देव नारायण पूजा, श्रीमत् पूर्णानंद स्वामी समाधी व सर्व समाधी पूजा,
सकाळी ७.३० ते ११ वा. मंगलाचरण, प्राकार शुध्दी, आवाहित देवता पूजन, नवग्रहपीठ आवाहन व पूजन, ग्रहयज्ञ, पवमानसुक्त हवन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहूती, सकाळी ११ ते १२.३० वा. सोळा ब्राह्मण पूजन व समाराधना, सकाळी
११ ते १२.३० वा.
भक्तीगीतांचा कार्यक्रम,
दुपारी १२.३० ते १.३० वा.
आरती व तीर्थप्रसाद,
दुपारी १.३० ते ३.०० वा.
महाप्रसाद, सायंकाळी
५ ते ७.०० वा.
ह.भ.प. मोहक बुवा रायकर, डोंबिवली यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी
७ ते ९ वा.
धुपारत व आरती,
रात्री ९ ते १.३० वा.भोजन,
रात्रौ १० ते ११ वा.पुराण वाचन व श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री
११ ते ४ वा. किर्तन, भजन, नामस्मरण, पहाटे
४ ते ६ वा.
लळीत कार्यक्रम व प्रार्थना ( रत्नाकर प्रभु कोचरेकर, कोचरा) आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. भाविकांनी सर्व धार्मिक
कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त,
श्री मठ संस्थान दाभोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
