पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती..
⚡सावंतवाडी, ता.०२-: शांतिसेना ‘ऑपरेशन पवन’ श्रीलंका येथे ३ एप्रिल १९८८ रोजी शहीद झालेल्या हवालदार रामचंद्र सोमा गावडे यांच्या पुतळ्याचे अनावरण व स्मारक उद्घाटन सोहळा गुरुवार, ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
केगदवाडी, ता. सावंतवाडी येथील रामचंद्र निवास येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या स्वागताने होणार आहे. त्यानंतर दीपप्रज्वलन, प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शहीद गांगडे यांच्या पुतळ्याचे अनावरण व स्मारकाचे उद्घाटन, तसेच शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. पुढे मान्यवरांचे मनोगत, सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. नितेशजी नारायण राणे, तसेच मा. ना. दीपकभाई केसरकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
शहीद रामचंद्र गावडे यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
