पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गतवेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०१-: पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मंडलाचा निवासी दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न झाला.
यावेळी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते व वक्ते विलास हडकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, राज्य परिषद सदस्य राजु राऊळ, नगरसेवक रविंद्र शिरसाट, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे संयोजक व तालुका सरचिटणीस वसंत तांडेल यांचे सहकार्य लाभले.
या प्रशिक्षण वर्गास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इतिहास आणि विकास , विलास हडकर यांनी वैचारीक अधिष्ठान, महेश मांजरेकर यांनी आपल्या सरकारची कामगीरी, श्रीकृष्ण परब यांनी सोशल मिडीया – नमो अँप – सरल अँप, गुरुनाथ उर्फ राजु राऊळ यांनी कार्यपध्दती, संदिप गावडे यांनी बुथव्यवस्थापन व SIR , रविंद्र मडगांवकर यांनी कार्यविस्ताराची आमची दृष्टी या विषयांवर वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. या प्रत्येक सत्राला अध्यक्ष म्हणून वसंत तांडेल, सुषमा खानोलकर, राजन गिरप, प्रितेश राऊळ, लक्ष्मीकांत कर्पे, सुहास गवंडळकर, नाथा मडवळ मान्यवर लाभले व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले वक्ता व अध्यक्ष यांचे वेंगुर्ला – काल-आज-उदया हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन साईप्रसाद नाईक, महादेव नाईक, विष्णू परब, मनवेल फर्नाडिस,मयूरेश शिरोडकर, गणेश गावडे, प्रणव वायंगणकर यांनी स्वागत केले. या प्रशिक्षण संदर्भात रफीक शेख, आकांक्षा परब, गौरी माईणकर, रिया केरकर, समीर कांबळी, महादेव नाईक ,मयूरेश शिरोडकर, गुरुप्रसाद चव्हाण, श्रीकृष्ण धानजी, सुषमा खानोलकर यांनी आपले प्रशिक्षण वर्गातील अनुभव कथन केले.यावेळी वेंगुर्ला मंडलातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख विविध सेलचे पदाधिकारी हे उस्फूर्तपणे सहभागी झाले. या प्रशिक्षणाचे वेंगुर्ला मंडल संयोजक व उपसंयोजक म्हणून रिया केरकर व गौरी मराठे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणात एकूण ७५ प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग दर्शवला. या प्रशिक्षणाचे सोशल मिडीया सरल अँप प्रमुख म्हणून अमेय धुरी व लक्ष्मीकांत कर्पे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणात जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचा सन्मान करण्यात आला. प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

You cannot copy content of this page