मळेवाड येथे बालदशावतार यांचा “शनि प्रताप” नाट्यप्रयोग…

⚡सावंतवाडी ता.०१-: वरची मळेवाड येथे श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून,सकाळी ६ वाजता अभिषेक ,पूजन ६:३० व तीर्थप्रसाद ,दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद ,सायंकाळी पाच वाजता भजन श्री देव वेतोबा प्रासादिक भजन मंडळ मुळीकवाडी तसेच सायंकाळी ७ वाजता बाल दशावतार नाट्य मंडळ यांचा, वार शनिदेवाचा आणि भक्ती हनुमंताची महत्व पटवून देणारा महान पौराणिक नाट्य प्रयोग “शनी प्रताप” अर्थात “कपि राघव संग्राम” हा नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाटकाचे संवाद लेखन अजित गाडगीळ, हार्मोनियम वादक विवेकानंद मुळीक, पखवाज दिनकर मुळीक,मार्गदर्शक संतोष रेडकर, तालरक्षक ज्ञानेश्वर मुळीक,नेपथ्य व वेशभूषा पुंडलिक परब,प्रज्वल परब असून,श्री हनुमान मंदिर, श्री देव घोडेमुख रंगमंच मुळीकवाडी (वरची मळेवाड) येथे आयोजित करण्यात आलं आहे.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव वेतोबा प्रासादिक भजन मंडळ, मुळीकवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page