⚡बांदा ता.०१-: इन्सुली येथील नाटेकर कुटुंबीयांच्या वतीने प. पू. आई नाटेकर यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, दिनांक २ एप्रिल रोजी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुण्यतिथी सोहळा इन्सुली दत्त मंदिर समोर उत्साहात व भक्तीभावात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती जन्म सोहळा, सकाळी ७.३० वाजता मारुती चरणी अभिषेक, सकाळी ८.३० वाजता प.पू. आईंच्या पादुकांचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होईल. दुपारी १२.३० वाजता आरती तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ५ वाजता महिलांची भजने होणार असून रात्री ९.०० वाजता हरिपाठ (वारकरी) सादर केला जाणार आहे. कार्यक्रमानंतर स्थानिक भजनाचा कार्यक्रमही होणार आहे.
या पुण्यतिथी सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाटेकर कुटुंबीयांनी केले आहे.
इन्सुली येथे गुरुवारी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन…
